TOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नवीन 15 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

पिंपरी चिंचवड | मावळ तालुक्यात शनिवारी (दि.01) 15 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 04 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 68 आहे.शहरी भागात 11 रूग्ण तर ग्रामीण भागात 04 रूग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 06 रूग्ण सापडले. तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 05 रूग्ण आज सापडले.आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत एकही रूग्ण आज सापडला नाही.

तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 27,863 झाली आहे. तर दिवसभरात 04 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.शनिवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात माऊ येथे 02 रुग्ण सापडले.तर कुणे नामा व वरसोली येथे प्रत्येकी 01 रूग्ण सापडला.असे एकूण 04 रूग्ण सापडले.27,270 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8,911, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,568व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,387 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 14,866 रुग्ण तर ग्रामीण भागात 12,997 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 97.87 टक्के आहे तर मृत्यू दर 1.88 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 18 ,लोणावळा नगरपरिषदमध्ये 18 , वडगाव नगरपंचायतमध्ये 04 व ग्रामीण भागात 28 असे एकूण 68 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button