breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

पुलवामा हल्ल्यातील दहशतवादी ठार?; अनंतनागमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची होणार DNA चाचणी

जम्मू-काश्मीर |

जम्मू – काश्मीरच्या अनंतनागमध्ये ३० डिसेंबर रोजी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचा चेहरा हा जैशचा टॉप कमांडर समीर दार याच्याशी जुळत असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी दिली. पोलीस यंत्रणा त्याचे डीएनए नमुन्यांची चाचणी करत आहेत, असे काश्मीर पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी म्हटले आहे. पुलवामा हल्ल्यात समीरचा सहभाग होता, ज्यात ४० सुरक्षा जवान शहीद झाले होते. जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झाले आणि एक जवान जखमी झाला. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यात या चकमकी झाल्या. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर माहितीच्या आधारे, सुरक्षा दलांनी कुलगाम जिल्ह्यातील मिरहमा भागात शोध मोहीम सुरू केली ज्यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.

पोलिसांच्या नोंदीनुसार, समीर दार उर्फ ​​हंजाला जिहादी हा सर्वात वरच्या श्रेणीतील दहशतवादी होता आणि काश्मीर खोऱ्यात कार्यरत असलेल्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश होता. २०१९च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात त्याचा सहभाग होता. एनआयएच्या आरोपपत्रातही तो या कटात सहभागी असल्याचे म्हटले होते. आर्मी कॅम्प काकापोरा वर हल्ला, दोन सीआरपीएफ जवानांची हत्या यासह पोलीस आणि सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ले करण्यातही त्याचा सहभाग होता. तरुणांना दहशतवादी गटांमध्ये सामील करण्यासाठी, दहशतवादी गटांमध्ये नवीन सदस्यांची नियुक्ती आणि शोध घेण्यासाठी तो कार्यरत होता. दरम्यान, जुलै २०२१ मध्ये समीर दारच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. ३१ जुलै रोजी झालेल्या एका चकमकीत जैश-ए-मोहम्मद कमांडर मोहम्मद इस्माईल अल्वी उर्फ ​​लंबू याच्यासह आणखी एक व्यक्ती मारला गेला होता. आधी या व्यक्तीची ओळख समीर दार अशी सांगण्यात येत होती, मात्र तो समीर दार नसून एक पाकिस्तानी नागरिक असल्याचे समोर आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button