breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

काश्मीरमध्ये दहशतवादाचे कंबरडे मोडण्यास सुरुवात; NIAचे १८ ठिकाणी छापे

जम्मू-काश्मीर |

जम्मू -काश्मीरमधील दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) सक्रिय झाली आहे. एक नवीन तक्रा नोंदवत एनआयएने द रेझिस्टन्स फोर्स आणि पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या भूमिगत कार्यकर्त्यांच्या १८ ठिकाणी छापे घातले आहेत. हे भूमिगत कार्यकर्ते जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन, अल बद्र आणि इतर संघटनांशी संबंधित आहेत. काश्मीर खोऱ्यात नागरिकांवर आणि इतरांवर अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे या संघटनांचा हात असल्याचे म्हटले जाते आणि हे भूमिगत कार्यकर्ते त्यांना मदत करत आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने जम्मू -काश्मीरमधील वातावरण बिघडवल्याबद्दल १० ऑक्टोबर रोजी नवीन एफआयआर नोंदवला आहे. या अंतर्गत आता संस्थेने कारवाई सुरू केली आहे. संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, टीआरएफला मदत करणाऱ्या प्रत्येक भूमिगत कार्यकर्त्यांची चौकशी केली जाईल. हेच लोक खोऱ्यात दहशत पसरवण्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करत आहेत. रेसिस्टन्स फोर्सची स्थापना पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयने केली आहे.

भारत सरकारने जम्मू -काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५अ हटवल्यानंतर पाक लष्कराने भारताविरुद्ध कारवाया करणे सुरु ठेवले आहे. यांसदर्भात एनआयएने मंगळवारी दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश आणि जम्मू -काश्मीरमधील १८ ठिकाणी छापे टाकले. जम्मू -काश्मीरमध्ये, गलबुह काकापोरा येथील रहिवासी अब खलिक दारचा मुलगा ओवैस अहमद दार यांच्या घरावर छापा टाकला. काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या नागरिकांच्या हत्येनंतर दहशतवाद्यांविरोधातील कारवाईचा हा एक भाग आहे असे सांगण्यात आले आहे. सोमवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. मृत दहशतवाद्याची ओळख इम्तियाज अहमद डार म्हणून झाली आहे, जो बंदी घालण्यात आलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. बांदीपोरा येथील शाहगुंड येथे नुकत्याच झालेल्या नागरिकांच्या हत्येमध्ये डारचा सहभाग होता. त्याच दिवशी जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये बंडखोरीविरोधी कारवाईदरम्यान झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे पाच जवान शहीद झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button