breaking-newsताज्या घडामोडीपुणेमुंबई

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात, सहा वाहने एकमेकांवर आदळली; तीन ठार, सहा जखमी

पुणे |

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर खोपोलीजवळ बोर घाटात एक भीषण अपघात झाला आहे. आज म्हणजेच १८ ऑक्टोबर २०२१ रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात तिघेजण ठार झाले तर सहा प्रवासी जखमी झाले आहेत.

मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर कोंबडी वाहून नेणाऱ्या टेम्पोने पुढच्या टेम्पोला धडक दिली. त्यानंतर एक दोन नाही तर तब्बल सहा वाहने एकमेकांवर आदळली यामध्ये दोन टेम्पो, दोन कार, खाजगी बस आणि ट्रेलर एकमेकांवर आदळले. अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळित झालेली वाहतूक आता सुरळीत आहे. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button