breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

Teachers Cooperative Credit Union PCMC : प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे ते ६ उमेदवार अखेर अपात्र

आजी माजी सभापतींना निवडणुकी पूर्वीच दणका

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची सन २०२२-२०२७ ची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली असून, या निवडणुकीमध्ये आजी, माजी सभापती, सचिव व संचालकांसह ८९ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.
नामनिर्देशन पत्र दाखल अर्थात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २४ नोव्हेंबर २०२२ अखेर होती. दि.२५ नोव्हेंबर २०२२ रोजी नामनिर्देशन पत्राची सकाळी ११:३० वाजेपासून छाननी निश्चित केली होती. छाननी दरम्यान आजी ,माजी सभापती यांच्या उमेदवारी अर्जावर संस्थेत तत्कालीन २००९-१० व २०१०-११ या काळात झालेल्या अफरातफर रक्कमेबाबत कलम ८८ नुसार चौकशी होऊन कर्मचारी व २२ संचालक यांना जबाबदार धरण्यात आले होते.
सदर हरकतीची दखल घेऊन तथा कागदपत्रे आणि पुरावे यांची शहानिशा करून निवडणूक निर्णय अधिकारी एम.जे श्रृंगारे यांनी आजी, माजी सभापतीसह ६ जणांना दि.२८ नोव्हेंबर २०२२ रोजी प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीमध्ये अपात्र घोषित केले होते. सदर हरकतीची दखल घेऊन तथा कागदपत्रे आणि पुरावे यांची शहानिशा करून निवडणूक निर्णय अधिकारी एम.जे श्रृंगारे यांनी आजी, माजी सभापतीसह ६ जणांना दि.२८ नोव्हेंबर २०२२ रोजी प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीमध्ये अपात्र घोषित केले होते. पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेला आदेश कायम करत अपात्र घोषित केले आहे.
तसेच, सदरील आदेश आजही कायम असल्याने यातील उमेदवार अर्ज दाखल असलेल्या मादगुडे नथुराम पर्वती, लावंड शरद भागवत, येणारे संजय दासा, ढोरे शालिनी श्याम, सचिव जंगम संतोष नथुलिंग, लिपिक जगताप दिनेश मनोहर या ६ उमेदवारांच्या उमेदवारी अर्जावर उमेदवार मराठे मनोज काशिनाथ यांनी हरकत घेऊन संबंधित यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. या निर्णयाविरोधात संबंधितांनी उपनिबंधक पुणे शहर-३ नागनाथ कंजेरी यांच्याकडे अपील दाखल केले होते. मात्र दरम्यानच्या काळामध्ये राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणामुळे सदरची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १७ संचालक असलेल्या प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणुकीची प्रक्रिया आहे त्या स्थितीत थांबवून काही कालावधीसाठी पुढे ढकलली होती. यानंतर दिनांक २१ डिसेंबर २०२१ पासून मा.कोर्टाच्या आदेशानुसार सदरची निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे.

अपीलाची सुनावणी दि.२६ डिसेंबर २०२२ रोजी मा.उपनिबंधक पुणे शहर-३ यांच्या दालनात होऊन सदर सुनावणीत उपनिबंधक नागनाथ कंजेरी यांच्यासमोर मराठे मनोज यांच्यावतीने ॲडव्होकेट माधव सोमण यांनी, तर मादगुडे नथुराम,संजय येणारे, शरद लावंड, जंगम संतोष,शालिनी ढोरे, दिनेश जगताप यांच्यावतीने अॅडव्होकेट श्रीमती पंचपोर यांनी कामकाज पाहिले. दोन्ही गटाचे म्हणणे व युक्तिवाद ऐकून घेऊन तसेच दोन्ही गटाने सादर केलेल्या पुराव्याची संपूर्णपणे शहानिशा करून आजी माजी सभापतींसह मादगुडे नथुराम पर्वती , लावंड शरद भागवत , येणारे संजय दासा, ढोरे शालिनी श्याम, जंगम संतोष नथुलिंग, जगताप दिनेश मनोहर यांना प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेला आदेश कायम करत अपात्र घोषित केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button