breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

T20 WC : बांगलादेशचा डाव ७३ धावांवर आटोपला; ऑस्ट्रेलियाचा धावगती वाढवण्यावर जोर

महाईन्यूज । टीम ऑनलाईन

टी २० वर्ल्डकपमध्ये सुपर १२ फेरीत ऑस्ट्रेलिया विरूद्ध बांगलादेश यांच्यात सामना होत आहे. बांगलादेशचा संपूर्ण संघ ७३ धावांवर बाद झाला. बांगलादेशनं ऑस्ट्रेलियासमोर विजयासठी ७४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. ऑस्ट्रेलिया ही धावसंख्या कमी षटकात पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. कारण धावगती राखल्यास उपांत्य फेरीचा मार्ग सुकर होणार आहे.उपांत्य फेरीसाठी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात चुरस आहे.

बांगलादेशचा डाव

बांगलादेशच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजासमोर अक्षरश: नांगी टाकली आहे. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर लिटन दासचा मिशेल स्टार्कने त्रिफळा उडवला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर सौम्या सरकार ५ धावा करून त्रिफळाचीत झाला. मुशफिकुर रहमानही जास्त काळ मैदानात तग धरू शकला नाही. अवघी एक धाव करून ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. मोहम्मद नईमही १६ चेंडूत १७ धावा करून हेझलवूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तर अफिफ होसैन आपलं खातंही खोलू शकला नाही. त्यानंतर महमुदुल्लाह (१६), अफिफ होसैन (०), शमीम होसैन (१९), महेदी हसन (०), मुस्ताफिजुर रहमान (४) आणि शोरिफुल इस्लाम (०) या धावसंख्येवर बाद झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button