breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमहिला दिनमुंबईराजकारणराष्ट्रिय

सुषमा अंधारे-संजय राऊत राहिले बाजूला, भाजपाचे आंदोलन पाकिस्तानच्या भुत्तोंविरोधात…

मुंबई ः संजय राऊत यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाविषयीची अनभिज्ञता आणि सुषमा अंधारे यांनी देवी देवतांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात भाजपाने आज माफी मांगो आंदोलनाचे आयोजन केले होते. मात्र, या आंदोलनात संजय राऊत आणि सुषमा अंधारे बाजूला राहिले असून पाकिस्तानच्या भुत्तोंविरोधातच भाजपाने आंदोलन छेडले.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून देशभरात भुत्तोंचा निषेध करण्यात येत आहे. त्याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही भुत्तोंविरोधात भाजपा आक्रमक झाली. संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात हल्लाबोल करण्यासाठी आयोजित केलेल्या आंदोलनात भाजपाने भुत्तोंचाच अधिक विरोध केल्याचं पाहायला मिळालं. माफी मांगो आंदोलनाची सुरुवात संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात झाली खरी पण उत्तरार्धात भुत्तोंविरोधातच आंदोलन रंगलं. त्यामुळे ऐनवेळी भुत्तोंचा विषय आला कुठून असा प्रश्न उपस्थित इतर आंदोलक कार्यकर्त्यांना पडला.

केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात बिलावल भुत्तो यांच्याविरोधात भाजपाने आंदोलन छेडले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत पुण्यातील अलका चौकात माहिती दिली. भुत्तोंचा निषेध करण्याकरता राज्यभरात १२०० ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले. तसेच, पाकिस्तान हाय हायच्या घोषणा देत बिलावल भुत्तो यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button