breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतवर चेन्नईत शस्त्रक्रिया, प्रकृतीत सुधारणा

चेन्नई – दाक्षिणात्य सुपरस्टार आणि दिग्गज अभिनेते रजनीकांत यांच्यावर मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. चेन्नईतील कावेरी रुग्णालयात रजनीकांत यांच्या मेंदूला पूर्ववत रक्तपुरवठा व्हावा यासाठी ही सीएआर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांना काही दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

रजनीकांत यांना काही दिवसांपूर्वी अचानक चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या मेंदूला कमी रक्तपुरवठा होत असल्याचे निदान करत डॉक्टरांनी त्यांच्यावर सीएआर म्हणजेच कार्टाइड आर्टरी रिव्हस्कुलरायझेशन शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शुक्रवारी त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती कावेरी रुग्णालयाचे सहव्यवस्थापक आणि कार्यकारी संचालक डॉ. अरविंद सेलवाराज यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button