breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

सुलक्षणा ही तर माझी मुलगी; तिने स्वतः ची ओळख निर्माण केली : डॉ. श्रीपाल सबनीस

  • पिंपरी- चिंचवड महापालिका भेटीत काढले गौरोवोद्गार
  • अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या दालनात अशोक शिलवंत यांच्या आठवणींना उजाळा

पिंपरी | प्रतिनिधी

“सुलक्षणा तर माझ्या मुलीसारखी आहे. तीने स्वतःची ओळख स्वतः निर्माण केली. या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो”, असे गौरवोद्गार 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या दालनात डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अशोक शिलवंत यांच्या आठवणींना उजाळा दिला. अशोक शिलवंत यांनी शून्यातून विश्व उभारले, अशा भावना डॉ. सबनीस यांनी व्यक्त केल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या दालनात डॉ. श्रीपाल सबनीस यांनी साहित्य संमेलनाबाबत पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी सुलक्षणा धर यांची ओळख करून देत असल्याचे पाहून डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ‘अरे तिची काय ओळख करून देताय, ती तर माझी मुलगी आहे’, असे म्हटले आहे.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, ‘अशोकरावांनी शून्यातून विश्व उभारले होते. त्यांचे कार्य संपूर्ण भारतभर होते. समाजात त्यांचं नाव आज खूप उंचीवर आहे. त्यांनी जीवनभर अखंड संघर्ष केला आहे. सुलक्षणाने पण स्वतःची ओळख स्वतः निर्माण केली. या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो.’

डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासारखे दिग्गज साहित्यिक आपल्याबाबत एवढी आत्मीयता दाखवतात. हे ऐकल्यावर मन भारावून गेले. त्याचबरोबर भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला, याचेही समाधान वाटले’, असे सुलक्षणा धर म्हणाल्या.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button