पिंपरी / चिंचवड

पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पिंपरी l प्रतिनिधी

पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 26) दुपारी चार वाजता सायली कॉम्प्लेक्स, वाल्हेकरवाडी चिंचवड येथे घडली. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

आकाश सुधाकर चौरे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रतिभा आकाश चौरे (वय 20) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी प्रतिभा यांच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला ‘मला तुझ्या घरच्यांनी स्वीकारले नाही. माझा कोणत्याही प्रकारचा मानपान करीत नाहीत’ असे म्हणून टोमणे मारून तसेच दारू पिऊन मारहाण केली. ‘तू इथे राहण्यापेक्षा मेलेली बरी’ असे देखील आरोपी म्हणत असे. त्या कारणावरून फिर्यादी यांच्या मुलीची आणि आरोपीची सतत भांडणे होत होती. आरोपीच्या त्रासाला कंटाळून शनिवारी दुपारी फिर्यादी यांच्या मुलीने तिच्या राहत्या घरात गळफास लाऊन आत्महत्या केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button