breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

स्पर्धा परीक्षेसाठी नवोदितांना प्रेरणा मिळवी यासाठीच यशस्वीतांचा सत्कार सोहळा : लहू बालवडकर

  • लहू बालवडकर सोशल वेल्फेअरतर्फे स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या यशवंतांचा सत्कार

पुणे । प्रतिनिधी

बुध्दीकौशल्याच्या जोरावर स्पर्धा परीक्षामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान व्हावा. भविष्यात चांगल्या प्रकारे प्रशासकीय सेवेत काम करून एक आदर्श घडविण्याच्या दृष्टीने त्यांना मान्यवरांचे मार्गदर्शन मिळावे. तसेच, परिसरातील तरुणांना यशस्वी अधिकाऱ्यांना पाहून स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्याकरिता प्रेरणा मिळावी. यासाठी यशस्वीतांचा सन्मान सोळा आयोजित केला, अशा भावना लहू बालवडकर सोशल वेलफेअरचे अध्यक्ष लहू बालवडकर यांनी व्यक्त केल्या. एमपीएससी व युपीएससी या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या जवळपास 30 विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ बालेवाडी येथे पाटील वस्ती येथील रणभूमी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडला.

श्री लहू बालवाडकर व श्री सतीश पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभास स्पेस अकॅडमीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रशासनात नवीन येणाऱ्या तसेच प्रशासनात कार्यरत असलेल्या एकूण ७० पेक्ष्या जास्त अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, आयएफएस राहुल पाटील, जॉईंट रेजिस्ट्रार मिलिंद आक्रे , माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.एस. वानखडे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पोलीस, महसूल, वन मंत्रालय, आयकर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सर्व प्रमुख वक्त्यांनी प्रशासनात येणाऱ्या नवीन अधिकाऱ्यांना स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करण्याविषयी कानमंत्र देऊन सर्व नवीन अधिकारांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचलन सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती योगिता म्हस्के यांनी, तर आभार प्रदर्शन अखिलेश खिस्ते यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button