breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#whatsapp ची कडक कारवाई; २० लाखांहून लाखांहून अधिक भारतीय खात्यांवर घातली बंदी

नवी दिल्ली |

व्हॉट्सअ‍ॅपने ऑगस्टमध्ये २० लाखांहून अधिक भारतीय खात्यांवर बंदी घातली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने नुकत्याच जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की या काळात त्यांना ४२० तक्रारी प्राप्त झाल्या. व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की त्यांनी एकूण २०,७०,००० भारतीय खात्यांवर बंदी घातली आहे. भारतीय खात्यांची ओळख फोन नंबरवरून केली गेल्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपने दिली आहे. याआधी, व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले होते की ज्या खात्यांवर कारवाई करण्यात आली त्यापैकी ९५ टक्क्यांहून अधिक खाती स्पॅम मेसेज पाठवण्यात गुंतलेली आहेत. प्लॅटफॉर्मचा गैरवापर टाळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने जगभरात दरमहा सुमारे ८ दशलक्ष खात्यांवर बंदी घातली आहे.

ऑगस्टच्या अहवालात, व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की त्याला अकाऊंट सपोर्टसाठी १०५ , बंदी आणण्यासाठी २२२, इतर सपोर्टसाठी ३४, प्रोडक्ट सपोर्टसाठी ४२ आणि सुरक्षिततेसाठी १७ अर्ज प्राप्त झाले आहेत, ज्यावर कारवाई करण्यात आली. व्हॉट्सअ‍ॅपने ५९४ तक्रारी आल्यानंतर १६ जून ते ३१ जुलै दरम्यान ३,०२७,००० भारतीय वापरकर्त्यांची खाती बंद केली होती. जागतिक स्तरावर व्हॉट्सअ‍ॅपने एका महिन्यात सुमारे ८ दशलक्ष खात्यांवर बंदी घातली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले की एंड-टू-एंड एन्क्रिप्शन धोरणामुळे ते वापरकर्त्यांचे संदेश पाहू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी, खात्यांमधील सिग्नल, एन्क्रिप्शनशिवाय काम करणारी वैशिष्ट्ये आणि वापरकर्त्याच्या अहवालांद्वारे निर्णय घेतला जातो. नवीन आयटी नियमांमुळे, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दर महिन्याला अनुपालन अहवाल सादर करावा लागत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button