breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी ३१ डिसेंबरपर्यंत KYC अपडेट करणे अनिवार्य

नवी दिल्ली – शेअर बाजारातील सर्व गुंतवणूकदारांनी त्यांच्या डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांचा वापर सुरू ठेवण्यासाठी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत know-your-customer म्हणजेच केवायसी डेटा अपडेट करणे आवश्यक आहे.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने आपल्या संदेशात म्हटले आहे की, ‘सर्व गुंतवणूकदारांना विनंती आहे, नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नाव, पॅन क्रमांक (PAN), पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि उत्पन्न या सहा बाबींची नोंद करावी. तुम्ही केवायसी अपडेट केले नाही, तर तुमचे डीमॅट आणि ट्रेडिंग खाते निष्क्रिय केले जाईल.’ तसेच गुंतवणूकदारांना त्यांच्या खात्यांबद्दल वेळोवेळी माहिती देण्यासाठी हे आदेश देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२१ आहे. त्यानंतर डीमॅट खात्यात कोणतेही डेबिट व्यवहार आणि केवायसी होईपर्यंत ट्रेडिंग खात्यात कोणताही व्यवहार करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याबाबतची शेवटची तारीख २१ जुलै २०२१ होती. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ही मुदत दोन वेळा वाढविण्यात आली. पहिल्यांदा ३० सप्टेंबर आणि नंतर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button