पिंपरी / चिंचवडराजकारण

घरात राहून नववर्षाचे स्वागत करा – राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार

– पिंपरी चिंचवड शहरात ओमायक्रॉनचा पहिला मृत्यू

– काळजी घेण्याचे पार्थ पवार यांचे आवाहन

पिंपरी l प्रतिनिधी

कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेला पिंपरी-चिंचवड शहरातील पहिला बळी गेला आहे. हा रुग्ण नायजेरियातून शहरात आला होता. वायसीएममध्ये उपचार घेत असताना मंगळवारी (दि. 28) ह्दयविकाराच्या झटक्यामुळे मंगळवारी निधन झाले. गुरुवारी (दि. 30) त्याचा ‘ओमायक्रॉन’चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोनाची रुग्णसंख्या देखील वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी नागरिकांना नववर्षाच्या पूर्वसंध्येला घरात राहून नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन केले आहे.

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केले आहे. त्यानुसार महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे तपासणी मोहीम सुद्धा सुरू आहे.

नायजेरियातून आलेल्या रुग्णाचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा ओमायक्रॉन’चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे ओमायक्रॉन’चा शहरातील पहिला बळी ठरला आहे. मृत्यू झालेल्या 52 वर्षीय व्यक्ती मागील 13 वर्षांपासून डायबेटीसची रुग्ण होती.

या पार्श्वभूमीवर युवा नेते पार्थ पवार यांनी ट्विटरद्वारे पिंपरी चिंचवडकरांना आवाहन केले आहे. सर्वांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला घरात राहून नववर्षाचे स्वागत करावे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

https://twitter.com/parthajitpawar/status/1476781675765895168?t=J5S9KXy7mf03TahNvuxE6Q&s=08

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button