breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

लहु बालवडकरांच्या समाजकार्याचा राज्यभर डंका; दिनदर्शिका प्रकाशनाला भाजपच्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी

पुणे । प्रतिनिधी
लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या माध्यमातून सुरू असलेल्या बालवडकरांच्या समाजकार्याचा आता राज्यभर डंका वाजू लागला आहे. काल (रविवारी) नववर्षानिमित्त दिनदर्शिका २०२२ चा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी राज्यातील दिग्गज नेत्यांसह खुद्द केंद्रिय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी उपस्थिती लावली. विविध माध्यमातून सुरू असलेल्या लहू बालवडकरांच्या समाजकार्याची दखल घेत त्यांनी तौंडभरून कौतूक केले. दरम्यान, प्रकाशित करण्यात आलेली दिनदर्शिका सुस, म्हाळूंगे, बाणेर, बालेवाडीतील नागरिकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे.

केंद्रिय राज्यमंत्री भागवत कराड यांचे यावेळी पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा कोथरूचे विधानसभेचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, राजेंद्र पांडे, संदिप खर्डेकर, नगरसेवक दीपक पोटे, कोथरूड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

यावेळी केंद्रिय मंत्री कराड म्हणाले, लहू बालवडकरांच्या समाजकार्याबद्दल ऐकून होतो. आज प्रत्यक्ष पाहिले आणि अभिमान वाटला. बालवडकरांनी सोशल वेलफेअरच्या माध्यमातून सुरू केलेले समजाकार्य सुस, म्हाळुंगे, बाणेर, बालेवाडीच नव्हे तर पुण्यासह राज्यातील समाजातील गरजूंना पाठबळ देते आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यात सहाय्य करते, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. लहूंनी समाकार्याचे कार्य सतत सुरू ठेवले पाहिजे. त्यामध्ये वैविध्यता असली पाहिजे. सन २०२२ ची दिनदर्शिकादेखील अतिशय आकर्षक असून त्याची संकल्पना लक्षवेधी आहे, असेही कराड यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोना संकटकाळात मोफत रुग्णवाहिका, बालेवाडीतील “पॉलिक्लिनिक” रुग्णालयात मोफत उपचार, रक्तदान शिबीर, गरीब-गरजू व्यक्तिंना अन्नधान्य यांसारख्या विविध समजाकार्याचा विडा आजही अविरतपणे चालू ठेवणारे बालवडकर राज्यभर नावलैकिकास आले आहे. तसेच लहु बालवडकर यांनी बाणेर, बालेवाडी, सुस आणि म्हाळुंगे परिसरातील नागरिकांचे लसीकरण करून लोकप्रतिनिधीसमोर एक नवा आदर्श ठेवला होता. तो आजही चालू आहे. त्यातच आता नववर्षानिमित्त २०२२च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करून नागरिकांना मोफत वाटप करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button