breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमडळाची बैठक

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. सायंकाळी 5.30 वाजता सह्याद्री अतिथीग्रहावर ही बैठक पार पडणार आहे.

दरम्यान, खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचे पडसाद या राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत उमटण्याची शक्यता आहे. डेलकर आत्महत्याप्रकरणात गृहखात्याकडून वेगाने तपास होत नसल्याचा सूर काँग्रेसने आळवला आहे. भाजप विविध प्रकरणात महाविकास सरकारला लक्ष्य करीत असताना डेलकर यांनी आत्महत्येआधी लिहलेल्या पत्रात अनेक मोठ्या हस्तीची नावे असूनही त्याबाबत गृहखाते मौन बाळगून असल्या बद्दल काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यावरून दोन्ही काँग्रेसमध्ये आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button