महाराष्ट्रराजकारण

ओबीसी मुद्द्यावरून रान उठवूनही पंकजा मुंडेंना डावलून प्रदेश भाजपची जोरदार ओबीसी कार्यकारिणीची बैठक

मुंबई: मुंबई येथे सोमवारी भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वेळी ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ झाला. आश्चर्य म्हणजे पक्षात ओबीसींचे नेतृत्व करत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या बैठकीला अनुपस्थित होत्या. पंकजा यांना या बैठकीचे निमंत्रण नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

ओबीसी हा भाजपचा मूलाधार आहे. राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची लढाई तीव्र आहे. त्या पार्श्वभूमीवर दादर येथील “वसंत स्मृती’मध्ये सोमवारी ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री व मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर, अॅड. आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, संगमलाल गुप्ता, डॉ. संजय कुटे, अतुल भातखळकर, योगेश टिळेकर उपस्थित होते. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपकडून पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हाती ओबीसी लढ्याचा सुकाणू दिलेला आहे. मात्र सोमवारच्या बैठकीला हे दोन्ही नेते गैरहजर होते. पंकजा मुंडे यांना ओबीसी मोर्चाच्या बैठकीचे निमंत्रण नव्हते, अशी माहिती मिळाली.

 

पंकजा मुंडे यांना बैठकीचे निमंत्रणच पाठवण्यात आले नव्हते,असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. मात्र ही बैठक प्रदेश कार्यकारिणीची होती अन् पंकजा या ‘राष्ट्रीय नेत्या’ आहेत, म्हणून त्यांना बैठकीचे निमंत्रण दिले नसल्याचे ओबीसी मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. पंकजा मुंडे यांनी मुंबईत नुकताच समर्थकांचा मेळावा घेतला होता.या वेळी मी राष्ट्रीय स्तरावर काम करणारी नेता आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा, जे.पी.नड्डा हेच माझे नेते आहेत, असे सांगून त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा नामोल्लेख टाळला होता, हे येथे उल्लेखनीय. दरम्यान, भाजपचे अनेक सेल आहेत. त्यापैकी ओबीसी मोर्चा एक आहे. त्याच्या कार्यकारिणीची बैठक होती. त्यामुळे पंकजा मुंडे बैठकीला नव्हत्या. यातून राजकीय अर्थ काढायची गरज नाही, असे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button