breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करा, राज्यातल्या चित्रपटगृहांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई – करोनामुळे राज्यात बंद असलेली चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाटय़गृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेत २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी राज्यातील चित्रपटगृहांनी योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावी अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. चित्रपटगृहे सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स एन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सह्याद्री अतिथिगृहात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्यातील चित्रपटगृहांसह आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहाना कसा दिलासा देता येईल यासाठी योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयाने काढण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

येत्या २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स एन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विविध परवान्यांचे नूतनीकरणासाठी राज्य शासनाने सवलत द्यावी तसेच सिनेमा लायसेन्सचे विनामूल्य नूतनीकरण करून द्यावे, जीएसटी भरल्यानंतर प्रत्येक तिकीटांमागे २५ रुपये सर्व्हिस चार्जेस आकारण्यास परवानगी द्यावी, विद्युत वापर नसल्याने देयके मिनिमम वापरावर आधारित असू नये, मिळकत कर आकारू नये, अशा मागण्याही यावेळी असोसिएशनच्या वतीने करण्यात आल्या. त्यावेळी या बैठकीस खासदार, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजय पांडे देखील उपस्थित होते. दरम्यान, चित्रपटगृहे, नाटय़गृहांसाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या आहेत. त्यानुसार, चित्रपटगृहे, नाटय़गृहे ५० टक्के आसनक्षमतेसह सुरू करण्यास परवानगी असेल. दोन प्रेक्षकांमध्ये एका खुर्चीचे अंतर ठेवावे, चित्रपटगृहांमध्ये मोकळ्या जागांमध्ये गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असून, सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना मास्क बंधनकारक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button