TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशी परिसरात बुस्टर डोस केंद्र सुरू करा : निखिल बोऱ्हाडे

  •  महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन

पिंपरी । प्रतिनिधी
कोविडच्या महामारीनंतर आता जनजीवन सुरळीत होत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या पुढाकाराने कोविड प्रतिबंधक लसीकरण तसेच दोन डोस घेतलेल्या नागरिकांना बुस्टर डोस मोहीम सुरू झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर मोशी-बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी- डुडूळगाव या परिसरातील शासकीय रुग्णालयांमध्ये बुस्टर डोस केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजपाचे कार्यकर्ते निखिल बोऱ्हाडे यांनी केली आहे.


याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मोशी- बोऱ्हाडेवाडी- जाधववाडी- डुडूळगाव येथील परिसरातील सरकारी रुग्णालयांध्ये बुस्टर डोस चालू करणे आवश्यक आहे. या परिसरातील नागरिकांना नजिकच्या ठिकाणी बुस्टर डोसची सुविधा नसल्यामुळे भोसरी किंवा चिंचवड या भागात जावे लागते. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने या भागात बुस्टर डोस सुविधा सुरू करावी.
याबाबत महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button