breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

एसटी महामंडळाचा भोसरीतील ‘ ट्रायल ट्रॅक’ अखेर सुरू करणार : रमाकांत गायकवाड

  •  भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा
  •  भरती प्रक्रियेत सहभागी सुमारे ३ हजार चालक, वाहकांना मिळणार दिलासा

पिंपरी । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागीय प्रशासनाचा भोसरी येथील वाहन चालक व वाहक ‘ट्रायल ट्रॅक’ लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच, येत्या २ ऑगस्टपासून महिला प्रशिक्षणही सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायवाड यांनी दिली. त्यामुळे भरती प्रक्रियेतील सुमारे ३ हजार चालक व वाहकांना दिलासा मिळणार आहे. कोरोना, लॉकडाउन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पुणे विभागातील ही भरती प्रक्रिया रखडली होती. याबाबत संबंधित उमेदवारांच्या प्रतिनिधींनी पिंपरी-चिंचवड भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांची भेट घेतली. पुणे विभागातील दुष्काळग्रस्त भागातील उमेदवारांसाठी असलेली ही भरती प्रक्रिया राबवण्याबाबत राज्य सरकारचा आदेश असतानाही प्रशासन हलगर्जीपणा का करीत आहे? असा सवाल दीपक मोढवे-पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केला. अखेर प्रशासनाने भरती प्रक्रिया राबवण्याचे आश्वासन दिले.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने २०१९ मध्ये दुष्काग्रस्त भागासाठी चालक तथा वाहक भरती (पुणे विभाग) सुरू केली होती. पुणे विभागात फेब्रुवारी २०१९ मध्ये १ हजार ६४७ जणांची भरती करण्यात येणार होती. त्यासाठी एस.टी. महामंडळाने २ हजार ९८२ उमेदवारांना वाहन चालन चाचणीसाठी दि. १७ जानेवारी २०२० रोजी उपस्थित राहण्यास सांगितले होते. यापैकी २ हजार ३०० उमेदवारांची ट्रायल झाल्यानंतर २५ फेब्रुवारी २०२० रोजी भोसरी येथील ट्रायल ट्रॅक बंद पडला होता. दरम्यान, कोरोना आणि लॉकडाउनमुळे ऑगस्ट २०२० मध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांनी भरतीला तात्पूरर्ती स्थगिती दिली होती. मात्र, दि. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी ही स्थगिती उठवली आहे. भरतीवरील स्थगिती उठवल्यानंतर परिवहन महामंडळाच्या सर्वच विभागांनी भरती प्रक्रिया जिथे थांबली होती तिथून पुन्हा सुरू करणे अपेक्षीत होते. पण, पुणे विभागाने परिवहन मंत्रालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली.

  • … अन्यथा भाजपा वाहतूक आघाडीच्या वतीने आंदोलन : मोढवे-पाटील

महाराष्ट्रातील अन्य विभागांत भरती प्रक्रिया पूर्ण होवून उमेदवारांचे प्रशिक्षणही सुरू झाले आहे. मात्र, पुणे विभाग टाळाटाळ करीत आहे. यावर तात्काळ कार्यवाही करा, अन्याथा उमेदवारांना सोबत घेवून भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मोढवे-पाटील यांनी दिला. त्यानंतर पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आणि प्रशासनाने नमते घेतले. येत्या २ ऑगस्टपासून महिला प्रशिक्षण सुरू करण्यात येईल. तसेच, भोसरीतील ‘ट्रायल ट्रॅक’ लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे उमेदवारांनी दीपक मोढवे-पाटील यांचे आभार मानले आहेत.

  • परिवहन मंत्र्यांकडून उमेदवारांची निराशा…

भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवून चार महिन्यांचा काळ लोटला, तरी पुणे विभागातील भोसरी विभाग नियंत्रण प्रशासन डोळेझाक करीत आहेत. भरती प्रक्रिया सुरू करण्याबाबत ट्रायल ट्रॅक सुरू करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. भोसरी विभाग नियंत्रण प्रशासन मुंबईतून अद्याप आम्हाला अध्यादेश आलेला नाही, असे कारण देत आहेत. तर मुंबईतील अधिकारी भोसरीच्या व्यवस्थापनाकडे बोट दाखवत आहेत. याबाबत संबंधित उमेदवारांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे धाव घेतली. दि. १८ मार्च २०२१ रोजी झालेल्या भेटीनंतर १ महिन्यात भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन मिळाले. पण, पुणे विभागामध्ये कोणतीही हालचाल झाली नाही, अशी व्यथा उमेदवार संतोष गायकवाड यांनी सांगितली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button