क्रिडाताज्या घडामोडी

RCB च्या विजयी रॅलीमध्ये चेंगराचेंगरी

दहा जणांचा मृत्यू, 30 जण जखमी

मुंबई : आरसीबीच्या संघानं तब्बल 18 वर्षांनी आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे, मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाबचा पराभव केला. दरम्यान त्यानंतर आज निघालेल्या आरसीबीच्या विजयी रॅलीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. आरसीबीच्या विजयी रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली, या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

तब्बल 18 वर्षांनी आरसीबीनं आयपीएलचं विजेतेपद मिळवलं . सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा लाडका खेळाडू विराट कोहोली यांचं स्वप्न 18 वर्षांनी साकार झालं. हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी आरसीबीच्या फॅननं चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठी गर्दी केली होती. याचवेळी ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 जण जखमी झाले आहेत, दरम्यान मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा –  ‘RCB’च्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी

आरसीबीनं तब्बल 18 वर्षांनंतर आयपीएलचं विजेतेपद मिळवलं आहे, हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी आरसीबीच्या फॅननं चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठी गर्दी केली होती. समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल 5 लाखांपेक्षा अधिक लोकं हा सोहळा अनुभवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. तर या स्टेडियमची आसन क्षमता अवघी 32 हजार इतकी आहे. स्टेडिअममध्ये जागा नव्हती, तरीही काहीजण आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, यानंतर चाहत्यांची पळापळ झाली, लाठीचार्जमुळे चेंगराचेंगरी झाली, त्यात दहा जणांचा मृत्यू झाला. दरम्यान जेव्हा ही घटना घडली त्यावेळी आरसीबीची टीम स्टेडियममध्ये उपस्थित नव्हती. ज्यावेळी चेंगराचेंगरी झाली, त्यावेळी आरसीबीच्या टीमचा विधानभवन परिसरात सत्कार सुरू होता.

इथे आलेल्या प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टेडियमचं दार बंद असल्यामुळे प्रेक्षकांची धावपळ उडाली, यातच पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर इथे चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण श्वास न घेता आल्यानं बेशुद्ध पडले आहेत. दरम्यान मृताचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button