क्रिडाताज्या घडामोडीमुंबई

कोलकाता नाईट रायडर्स टीममध्ये अचानक स्टार ऑलराउंडरची एन्ट्री

स्ट्रीट टेनिस क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूला केकेआरमध्ये नेट बॉल म्हणून संधी

मुंबई : आयपीएलच्या 18 व्या मोसमात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला आतापर्यंत काही खास असं करता आलेलं नाही. केकेआरने या हंगामात एकूण 5 सामने खेळले आहेत. केकेआरने त्यापैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 3 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. मुंबईकर अजिंक्य रहाणे याच्याकडे केकेआरच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. केकेआरची या मोहिमेची सुरुवात पराभवाने झाली. आरसीबीने केकेआरला पराभूत केलं. मात्र त्यानंतर केकेआरने पलटवार केला. केकेआरने दुसऱ्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभूत करत विजयाचं खातं उघडलं. त्यानंतर 3 पैकी 1 सामन्यांतच केकेआरला जिंकता आलं. केकेआरने सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवला. त्यानंतर आता केकेआरच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.

केकेआरच्या गोटात 18 व्या मोसमादरम्यान एका ऑलराउंडरची एन्ट्री झाली आहे. स्ट्रीट टेनिस क्रिकेट स्पर्धेतील (ISPL) खेळाडूला केकेआरमध्ये नेट बॉल म्हणून संधी देण्यात आली आहे. अभिषेक कुमार दलहोर याचा नेट बॉलर म्हणून कोलकाता टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. अभिषेकने आयएसपीएल स्पर्धेतील 2 हंगामात ‘माझी मुंबई’ टीमसाठी ऑलराउंडर म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

हेही वाचा –  ‘इलेक्ट्रिक सोलर व्हेईकल चॅम्पियनशिप’मध्ये पीसीसीओई अव्वल

अभिषेक आयएसपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. अभिषेकने आयएसपीएल स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं. अभिषेकला याच कामगिरीच्या जोरावर केकेआरने नेट बॉलर म्हणून आपल्यासह जोडलं आहे.

केकेआर चेन्नईविरुद्ध भिडणार
दरम्यान केकेआर या हंगामातील आपला सहावा सामना हा 11 एप्रिलला खेळणार आहे. केकेआर या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध भिडणार आहे. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

अभिषेक कुमार दलहोरची एन्ट्री

कोलकाता नाईट रायडर्स टीम: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, एनरिच नॉर्खिया, मनीष पांडे, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, लवनीथ सिसोदिया, चेतन साकारिया, रहमानउल्ला गुरबाज, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल आणि मोईन अली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button