हार्दिक पंड्याची दिलदार कृती; वानखेडे ग्राऊंडस्टाफला प्रत्येकी १० लाखांचा सन्मान

Hardik Pandya | भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने आपल्या उदार वृत्तीचे दर्शन घडवत मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील ग्राऊंडस्टाफचा विशेष सन्मान केला आहे. पंड्याने मैदानावरील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे धनादेश देत त्यांच्या मेहनतीची दखल घेतली. त्याच्या या कृतीचे क्रिकेट विश्वात मोठे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी हार्दिक पंड्या वानखेडे स्टेडियमवर सातत्याने सराव करत होता. अनेकदा तो रात्री उशिरापर्यंत नेट्समध्ये घाम गाळत असे. या काळात मैदानावरील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेळ थांबून त्याच्या सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागत होत्या.
हेही वाचा : देशात पुन्हा लॉकडाऊन? केंद्र सरकारने अफवांवर दिले स्पष्टीकरण
विशेष म्हणजे, ग्राऊंडस्टाफने कोणतीही तक्रार न करता हार्दिकच्या सरावात पूर्ण सहकार्य केले. त्यांच्या या मेहनतीची दखल घेत हार्दिकने सर्व कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत देत कृतज्ञता व्यक्त केली.
हार्दिक पंड्याच्या या कृतीमुळे खेळाडू आणि मैदानावरील कर्मचाऱ्यांमधील स्नेह व परस्पर आदराचे नाते अधोरेखित झाले असून, सोशल मीडियावरही त्याच्या या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले जात आहे.




