फायनलमध्ये विराटच्या जागी मॅचविनर खेळाडूला संधी
भारतीय संघात कोणता मोठा बदल, विराट कोहली सलामीला अपयशी ठरला
बार्बाडोस : विराट कोहली हा सातत्याने या टी २० वर्ल्ड कपमध्ये अपयशी ठरलेला आहे. विराटला आतापर्यंत एकही मोठी खेळी साकारता आलेली नाही. त्यामुळे भारतीय संघ आता वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत कोणतीही जोखीम घेणार नाही. त्यामुळे आता विराट कोहलीच्या जागी कोणत्या खेळाडूला खेळवायचे, हे आता समोर येत आहे.
विराट हा आतापर्यंत एकदाही वर्ल्ड कपमध्ये मोठी खेळी साकारू शकेलला नाही. त्यामुळे त्याला अंतिम फेरीत खेळवणार की नाही, याबाबत बऱ्याच जणांच्या मनात शंका आहे. अंतिम फेरीत विराट कोहलीच्या जागी आता कोणत्या खेळाडूला खेळवायचे हे आता जवळपास निश्चित झालेले आहे. कारण आतापर्यंत यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांना एकही सामना खेळवण्यात आलेला नाही.
विराटच्या आतापर्यंत या वर्ल्ड कपमध्ये ३७ धावा सर्वाधिक आहेत. यापेक्षा जास्त त्याला एका सामन्यात धावा करताच आलेल्या नाहीत. बऱ्याच सामन्यांत तर तो पहिल्या २-३ षटकांतच बाद झाला आहे. त्यामुळे भारतीय संघातील सर्वात अयशस्वी फलंदाज, अशी छाप आता कोहलीवर पडली आहे. कारण कोहली सलामीला येऊन अपयशी ठरत असल्यामुळे त्याला आता तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला पाठवले जाऊ शकते. त्यामुळे आता कोहलीच्या जागी भारताचा धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतला संधी मिळू शकते, असे समोर येत आहे. पंत डा डावखुरा फलंदाज तर आहेच, पण त्याचबरोबर तो तुफानी फटकेबाजी करू शकतो.एकदा का पंतची बॅट तळपली तर तो कोणत्याही गोलंदाजाला ऐकणार नाही. त्याचबरोबर सलामीला भारतासाठी उजवी आणि डावी जोडी येऊ शकते, जी गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे जर पंतला रोहित शर्माबरोबर सलामीला आणले तर भारताच्या दोन्ही समस्या मिटू शकतात. त्यामुळे या सामन्यात हा एकमेव मोठा बदल भारतीय संघात पाहायला मिळू शकतो.
विराट कोहली हा आयपीएलमध्ये सलामीला येत होता. सलामीला येत विराटने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला वर्ल्ड कपमध्ये सलामीला पाठवले होते. पण वर्ल्ड कपमध्ये मात्र तो सलामीला येऊन अपयशी ठरला आहे. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यासाठी कोहलीच्या जागी पंत सलामीला येऊ शकतो, असे म्हटले जात आहे. भारतासाठी हा एक नवीन प्रयोग असेल. पण तसंही पंत चांगल्या फॉर्मात नाही आणि तो तिसऱ्या स्थानावरच फलंदाजीला येतो. त्यामुळे तो जर सलामीला आला तर जास्त मोठा फरक पडणार नाही.