मॅचमध्ये झालेल्या मोठ्या ब्लंडरची सगळीकडे चर्चा आहे. नेमकं काय झालं ?
कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सची बॅटिंग सुरू असताना 7 व्या ओव्हरमध्ये जबरदस्त बवाल

हैदराबाद : इंडियन प्रीमिअर लीग (IPL) 2025 च्या सीझनमध्ये काल अर्थात 17 एप्रिल (गुरूवार) मुंबई इंडियन्स वि. सनरायजर्स हैदराबादमध्ये सामना रंगला. वानखेडेमध्ये झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने 4 विकेट्सनी विजय मिळवला. विजयासाठी असलेले 163 धावांचे आव्हान मुंबईने 11 चेंडू राखून सहज पूर्ण केलं.पण याच मॅचमध्ये झालेल्या मोठ्या ब्लंडरची सगळीकडे चर्चा आहे. नेमकं काय झालं ?
आऊट झालेला फलंदाज परत मैदानावर आला आणि..
कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सची बॅटिंग सुरू असताना 7 व्या ओव्हरमध्ये जबरदस्त बवाल झाला. ती ओव्हर सनरायजर्स हैदराबादचा स्पिनर झिशान अन्सारीने टाकली होती. त्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर अन्सारीने मुंबईचा फलंदाज रयान रिकेल्टनला पॅट कमिन्सकडून बाद केलं. त्यानंतर रिकेल्टन हा बाऊंड्री लाईनपर्यंत पोहोचला होता. मात्र तेवढ्यात जे घडलं त्याने सगळेच हैराण झाले. फोर्थ अंपायरने रिकेल्टनला बाऊंड्रीपाशीच रोखलं.
हेही वाचा – राज्यात नव्याने ६५ तालुका बाजार समित्या होणार ; जाणून घ्या, कोणत्या तालुक्यांची निवड झाली
रयानला रोखण्याचं कारण म्हणजे विकेटकीप हेनरिक क्लासेन याने केलेल घोडचूक.. जेव्हा चेंडू बॅटला लागला तेव्हा क्लासेनचे ग्लोव्हज स्टंपसमोर पोहोचले होते, असे रिप्लेमध्ये थर्ड अंपायरला आढळलं. नियम 27.3.1 अनुसार,जर विकेटकीपरने स्टंपसमोर किंवा स्टंपच्या रेषेत चेंडू घेतला तर पंच नो-बॉलचा संकेत देऊ शकतात.
जरी हेनरिक क्लासेनला बॉल उचलण्याची गरज नव्हती कारण बॉल त्याच्याकडे आला नाही, तरीही त्याचे ग्लोव्हज स्टंपसमोर होते. अशा परिस्थितीत, नियमांनुसार, हा बॉ नो-बॉल घोषित करण्यात आला. विकेटकीपरच्या निष्काळजीपणामुळे रायन रिकेलटनला जीवनदान मिळाले. त्यामुळे बाद झालेल्या रायन रिकेलटनला फलंदाजीसाठी पुन्हा बोलावण्यात आले आणि त्याने फ्री-हिट बॉलचा सामना केला. ही घटना घडली तेव्हा तो २१ धावांवर होता. नंतर रिकेल्टनने आणखी 10 धावा फटकावल्या. मात्र त्यानंतर हर्ष पटेलने रिकेल्टनचा बळी घेतला.
माजी अंपायर अनिल चौधरी काय म्हणाले?
कॉमेंट्री करणाऱ्या हरभजन सिंग आणि अंबाती रायुडू या दोघांनीही या विषयावर चर्चा केली. यादरम्यान, आधी अंपायर असलेले व नंतर कॉमेंट्रेटर बनलेले अनिल चौधरी यांच्याशीही ते दोघे बोलले. खेळादरम्यान क्लासेनचे ग्लोव्हज पुढे आले होते, म्हणूनच चेंडू नो बॉल घोषित करण्यात आला, असं त्यांनी सांगितलं.