क्रिडाताज्या घडामोडी

बीसीसीआयची दोन कसोटींसाठी वॉशिंग्टन सुंदरची भारतीय संघात निवड

भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पराभव

बंगळुरू : भारतीय संघ सध्या न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना बंगळुरूमध्ये पार पडला. या सामन्यात रविवारी (२० ऑक्टोबर) भारताला पराभूत व्हावं लागलं. आता भारताला न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना पुण्यात, तर तिसरा कसोटी सामना मुंबईमध्ये खेळायचा आहे. या सामन्यांआधी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघात बदल केला आहे. या दोन्ही सामन्यांसाठी अष्टपैलू क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरला भारतीय संघात सामील करण्यात आले आहे. रविवारी झालेल्या पराभवानंतर बीसीसीआयने हा निर्णय जाहीर केला आहे.

वॉशिंग्टन सुंदरने नुकतेच रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत दिल्लीविरुद्ध तामिळनाडू संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळताना १५२ धावांची दीडशतकी खेळी केली होती. हा सामना सुरू असतानाच वॉशिंग्टनला आता भारतीय संघात संधी मिळाली आहे. तो आता रणजी सामना सोमवारी संपल्यानंतर पुण्यात भारतीय संघात सामील होईल. वॉशिंग्टन सुंदरने यापूर्वी भारताकडून चार कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३ अर्धशतकांसह २६५ धावा केल्या आहेत आणि ६ विकेट्स घेतल्या आहेत.

भारतीय संघाला पुण्यामध्ये २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळायचा आहे. तसेच तिसरा कसोटी सामना १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना होणार आहे. सध्या या मालिकेत न्यूझीलंडने पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडने पुणे किंवा मुंबई यातील एका जरी सामन्यात विजय मिळवला, तर न्यूझीलंड ही कसोटी मालिकाही जिंकतील. त्यामुळे भारतासमोर आता पुनरागमन करण्याचे आव्हान असणार आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button