#AUSvIND 2nd Test : तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 4 बाद 132

पर्थ – भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर 4 बाद 132 धावांपर्यत मजल मारली आहे. याबरोबरच पहिल्या डावातील 43 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर एकूण 175 धावांची आघाडी घेतली आहे.
कालच्या 3 बाद 172 वरून पुढे खेळताना भारतीय संघाचा पहिला डाव 283 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाचा चौथा बळी हा अंजिक्य रहाणे ठरला. रहाणे तिसऱ्या दिवशी एकही धाव न काढता 51 वर बाद झाला. तर विराट कोहलीनं कालच्या नाबाद 82 धावांवरून पुढे खेळताना कसोटी क्रिकेटमधील आपले 25 वे शतक पूर्ण केले. विराट 123 धावांवर बाद झाला.
त्यानंतर ऋषभ पंत वगळता भारताचा एकही फलंदाज मैदानावर जास्त काळ तग धरू शकला नाही. ऋषभ पंतने 50 चेंडूत 36 धावा केल्या. तर हनुमा विहारी 20, मोहम्मद शमी 0, इंशात शर्मा 1, उमेश यादव 4 आणि बुमराह 4 धावांवर बाद झाला.