Breaking-newsक्रिडा

दीपक पुनियाची अग्रस्थानी झेप

  • बजरंगने अव्वल स्थान गमावले; राहुल आवारे दुसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली : जागतिक स्पर्धेत रौप्यपदकावर नाव कोरणारा भारताचा कुस्तीगीर दीपक पुनिया याने ८६ किलो वजनी गटात अग्रस्थानी झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाकडून जाहीर झालेल्या क्रमवारीत बजरंग पुनिया याने ६५ किलो वजनी गटातील आपले अव्वल स्थान गमावले असून महाराष्ट्राच्या राहुल आवारेने ६१ किलो गटात दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे.

नूर-सुलतान येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत दीपकने आपल्या प्रतिस्पध्र्याना धूळ चारत अंतिम फेरीत मजल मारली होती. मात्र इराणच्या हसन याझदानीविरुद्धच्या अंतिम लढतीत दीपकला घोटय़ाच्या दुखापतीमुळे रिंगणात उतरता आले नाही. त्यामुळे त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. २० वर्षीय दीपकने क्रमवारीत मात्र याझदानीला चार गुणांनी मागे टाकत ८२ गुणांसह अग्रस्थान काबीज केले आहे.

२५ वर्षीय बजरंगला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागल्यानंतर त्याने कांस्यपदकावर मोहोर उमटवली होती. यामुळे त्याच्या क्रमवारीत घसरण झाली असून तो ६३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. सुवर्णपदक पटकावणारा रशियाचा गदधिमुराद राशिडोव्ह याने अग्रस्थान पटकावले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button