ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे गुरवला ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शोभाताई नवनाथ जांभुळकर यांच्यावतीने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपळे गुरव येथील बँक ऑफ महाराष्ट्रजवळील चौकात सामाजिक कार्यकर्त्या व प्रतिभा महिला पतसंस्थेच्या उपाध्यक्षा शोभाताई जांभुळकर यांच्या वतीने आयोजित केलेल्या न्यू होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी अश्विनीताई लक्ष्मण जगताप शुभांगीताई शंकरशेठ जगताप ,सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई नवनाथ जांभुळकर, शिक्षण मंडळ सभापती माधवीताई राजापुरे, शहर भाजपा पदाधिकारी उज्वलाताई गावडे, नगरसेविका उषाताई मुंढे,पल्लवीताई जगताप,कावेरीताई जगताप, रवीनाताई आंघोळकर सुषमाताई कदम ,डॉक्टर सीमाताई ननवरे, दिपालीताई जगताप,सुजाताताई कांबळे, वैशालीताई जवळक,किरणताई नवले आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी क्रांती नाना मळेगावकर यांच्या ‘खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत स्पर्धेचा आनंद लुटला. स्पर्धेत राखी वाजानी, वर्षा नेटके, प्रतिभा टिळेकर, प्रतिभा पाटील, सायली चौगुले विजेत्या आदी महिलांनी मानाची बक्षिसे पटकावली. सहभागी महिलांनाही आकर्षक पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

त्याचबरोबर चांडाळ चौकटीच्या करामती या लोकप्रिय कार्यक्रमातील कलाकारांनी देखील या ठिकाणीउपस्थिती दर्शवत नागरिकांचे मनोरंजन केले . सदर कार्यक्रमास महिलांचा मिळालेला प्रतिसाद खरोखरच उल्लेखनीय होता. यावेळी बोलताना शोभाताई जांभुळकर म्हणाल्या कार्यसम्राट आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी सांगवी,नवी सांगवी,पिंपळे गुरव परिसराचा कायापालट केला आहे. भाऊ म्हणजे परिस आहेत . यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अश्विनीताई जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्व नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्‍या संयोजनातून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल शोभाताई नवनाथ जांभळकर यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संयोजनासाठी भाऊसाहेब जांभुळकर, ज्ञानेश्वर जांभूळकर यांनी पुढाकार घेतला .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button