breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

 ‘स्पर्श’ मनमानी प्रकरणातील कुणालाही पाठिशी घालणार नाही : खासदार अमोल कोल्हे

  • पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘त्या’ नगरसेविकेला इशारा
  • महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या भूमिकेकडे शहरावासीयांचे लक्ष

 

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी- चिंचवड महापालिका प्रशासनाच्या खर्चाने सुरू असलेल्या ऑटो क्लस्टर येथील कोविड केअर सेंटरमध्ये मोफत उपचार सुविधा असताना ‘स्पर्श’ संस्थेकडून आयुसीयू बेडसाठी एक लाख रुपयांची ‘लूट’ केल्याप्रकरणात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरुर लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला.

महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या पिंपरी येथील जम्बो कोवीड-१९ सेंटरला तसेच ऑटो क्लस्टर, चिंचवड येथील कोवीड-१९ रुग्णालयाला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा आणि माहिती घेतली. त्यानंतर महापालिका भवनातील पत्रकार परिषदेत खासदार कोल्हे बोलत होते.

यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त राजेश पाटील, माजी महापौर योगेश बहल, संजोग वाघेरे आदी उपस्थित होते.

कोविड सदृश लक्षणे दिसत असतील अथवा कोविड बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यास तात्काळ कोरोनाची चाचणी करुन निदान करणे गरजेचे आहे. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केल्यानंतर कोवीड बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे असे नमूद करुन खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, आरोग्य रक्षणाची जबाबदारी आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि सरकार यांची जेवढी आहे तेवढीच जबाबदारी प्रत्येकाची देखील आहे.

***

राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर कारवाई होणार?

स्पर्श या खासगी संस्थेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका नगरसेविकेचा ‘सपोर्ट’ आहे, अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी भोसरीतील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार केला नसतानाही बोगस बीले सादर केल्यामुळे ‘स्पर्श’ ही संस्था वादात सापडली होती. मात्र, संबंधित नगरसेविकेच्या हट्टामुळेच ‘स्पर्श’ च्या मनमानीला ‘साईड कॉर्नर’ केले जात आहे. विशेष म्हणजे, वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने महापालिकेतील तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यात आला होता. त्यामुळे खासदार कोल्हे यांनी विश्वास दिल्याप्रमाणे संबंधित नगरसेविकेवर कारवाई होणार का? असा प्रश्न पिंपरी-चिंचवडकरांना पडला आहे.

***

भाजपा नगरसेवकाला नेत्यांची ‘मूक संमती’?

‘स्पर्श’ च्या मनमानीला खतपाणी घालण्यात महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचा ‘स्मार्ट’ नगरसेवकाचा हात आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ऑटो कल्स्टर कोविड केअर सेंटरमधील ‘स्पर्श’ च्या मनमानीला पाठिशी घालणाऱ्या स्वपक्षीय नगरसेविकेवर योग्य ती चौकशी करुन दोषी आढळल्यास कारवाई करण्याचा विश्वास  खासदार अमोल कोल्हे यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिला. पण, भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी याबाबत अधिकृतपणे काहीच भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे संबंधित नगरसेवकाला भाजपा नेत्यांची मूक संमती आहे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button