Uncategorized

दक्षिण आफ्रिकेची संसद इमारत आगीत जळून पूर्णपणे भस्मसात

केपटाऊन | दक्षिण आफ्रिकेच्या संसदेला भीषण स्वरुपाची आग लागल्याने ही इमारत पूर्णपणे जळून भस्मसात झाली आहे. आगीमुळे संसदेचा संपूर्ण परिसर काळ्या धुरामुळे वेढला गेला होता. स्थानिक वेळेनुसार काल सकाळी सहाच्या सुमारास ही आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, ही आग विझविण्यासाठी सुमारे ७० अग्निशमन दलाच्या तुकड्या तैनात केल्या होत्या. काहीजण आगीवर पाणी मारण्यासाठी क्रेनचा वापर करताना दिसत होते.

या संसद इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरुवातीला आग लागली पण आग लागताच अग्निशमन दल अलार्म वाजला नव्हता. आग भडकली आणि वेगाने इमारतीत फिरू लागल्यानंतर अलार्म वाजला, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व पायाभूत सुविधा मंत्री पत्रीसिया डी लिली यांनी दिली. दक्षिण आफ्रिकेच्या लोकशाहीसाठी ही एक अत्यंत दु:खद घटना आहे. ही संसदेची इमारत म्हणजे आमच्या लोकशाहीचे निवासस्थान आहे, अशा शब्दात डी लिली यांनी आपले दुःख व्यक्त केले. तर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा यांना आगीची घटना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. आग लागल्यानंतर इमारतीच्या फायर स्प्रिन्कलमधून पाणी आलेच नाही, त्यामुळे आग भडकत गेली. या इमारतीत कमी संख्येने लोक असल्याने त्यांनी तिथून लगेच बाहेर पळ काढला. ही इमारत १८८४,१९२० आणि १९८० अशा तीन टप्प्यात बांधण्यात आली होती. याठिकाणी एकावेळी ४०० लोकप्रतिनिधी कामकाज करत असायचे. दुपारपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button