breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

दक्षिण आफ्रिका : माजी राष्ट्रपतीला तुरुंगात टाकले; समर्थकांनी पेटवली दंगल

जोहानसबर्ग – दक्षिण आफ्रिका देशाचे माजी राष्ट्रपती जॅकब जुमा यांच्या समर्थनार्थ दंगल आणि मोठ्या प्रमाणात हिंसा होत आहे. जॅकब जुमा यांनी कोर्टाचा अवमान केल्याबद्दल तुरुंगात पाठवण्यात आले, त्याचा विरोध करण्यासाठी ही दंगल होत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच आफ्रिका सरकारने जोहानसबर्ग शहरात मोठ्या प्रमाणात जवान तैनात केलेले आहेत.

कोर्टाच्या बाहेर सुरू असणाऱ्या दगंलीच्या वेळी कोर्टात जॅकब जुमा यांना १५ महिन्यांचा तुरुंगवास देण्याच यावा, अशी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर कोर्टात सुनावणी सुरू होती. संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत ७२ लोकांचा मृत्यू झाला असून ४०० पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली आहे.

गौंटेग आणि क्वाजुलू-नताल प्रांतात दंगलीच्या ठिकाणी नियंत्रण मिळविण्यासाठी जवाना तैनात करण्यात आले आहेत. क्वाजुलू-नताल हा प्रांत जॅकब जुमा यांचा बालेकिल्ला आहे. जुमा हे २००९ ते २०१८ या कालावधीमध्ये दक्षिण आफ्रिका देशाचे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकालात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी सुरू होती. न्यायित आयोगासमोर जुमा हजर झाले नसल्यामुळे त्यांना कोर्टाचा अवमान झाला असा ठपका बसला. कोर्टाच्या अवमान प्रकरणी जुमा यांना एस्टकोर्ट करेक्शनल सेंटरमध्ये बंद करण्यात आले आहे.

दंगलकर्त्यांकडून वाहनांची जाळपोळ

जुमा यांना १५ महिन्यांचा शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर बुधवारी त्यांना पोलिसांनी अटक केली. ७९ वर्षीय जुमा यांनी त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले आहेत. जुमा यांना अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांना देशभर आंदोलने केली. त्यांनी टायर जाळून रस्ता रोको केले. इतकंत नाही दंगलकर्त्यांनी वाहनांनाही पेटवून दिले आहे. रस्त्यावरील दुकांनांची लूट केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button