पिंपरी / चिंचवडपुणे

महिलेच्या विनयभंग प्रकरणी सोसायटीच्या चेअरमनला अटक

पिंपरी l प्रतिनिधी

सोसायटीचा चेअरमन असलेल्या 62 वर्षीय व्यक्तीने सोसयटीतील 40 वर्षीय कामगार महिलेचा विनयभंग केला. पोलिसांनी चेअरमनला अटक केली आहे. हा प्रकार सन 2020 पासून 23 डिसेंबर 2021 या कालावधीत चिंचवड येथील देवेलिंग को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कार्यालयात घडला.

गोपाल हरिराम खत्री (वय 62, रा. देवेलिंग को. ऑपरेटिव्ह सोसयाटी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी 40 वर्षींय कामगार महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे सोसायटीचे अध्यक्ष आहे. तर, फिर्यादी महिला या सोसायटीच्या मेन्टेनन्सचे काम पाहतात. गेल्या दोन वर्षांपसून आरोपी खत्री हे फिर्यादी यांच्याशी अश्लिल वर्तन करत आहेत. तु फक्त माझ्याशीच संपर्क ठेव, इतरांशी बोलू नको, असे म्हणत आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

तसेच 18 डिसेंबर रोजी आरोपीने फिर्यादीस सोसायटीच्या कार्यालयात बोलावून त्यांना लग्नाची मागणी घातली. फिर्यादी यांनी त्यांना लग्नाला नकार दिला. त्या वेळी आरोपीने फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. तसेच ‘तेरे को देख लुंगा, अब देख मै तेरे साथ क्या करता हू’, असे म्हणत आरोपीने फिर्यादी महिलेला शिवीगाळ केली. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button