breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

सोशल मीडिया स्टार फैजल शेखला अटक

मुंबई – जवळपास अडीच कोटींच्या घरात फॉलोअर्स असलेला सोशल मीडियावरील स्टार फैजल शेख उर्फ फैजू याला अटक झाली आहे. भरधाव वेगात कार चालवत एका सोसायटीच्या गेटला धडकून अपघात केल्याने ओशिवरा पोलिसांनी फैजूच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सोसायटीचे नुकसान झाले.

टिक टॉक आणि इन्स्टग्राम स्टार असलेला फैजू काल रात्री त्याच्या सहकाऱ्यांसह ओशिवरा येथील मिलत नगर विभागात त्याच्या बीएमडब्लू कारने आला होता. येथे भरधाव वेगात असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती थेट अल तबुत सोसायटीच्या गेटला धडक देऊन आत घुसली. रात्रीची वेळ असल्याने याठिकाणी कोणी व्यक्ती त्यावेळी उपस्थित नव्हती. परंतु सोसायटीचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी फैजूविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केले. दरम्यान, इन्स्टाग्रामवर फैजूचे तब्बल अडीच कोटीच्या जवळपास फॉलोअर्स आहेत. तसेच त्याचे अकाऊंट व्हेरीफाईड आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button