पिंपरी / चिंचवड

रिक्षातून प्रवास करणाऱ्या शिक्षिकेची पर्स हिसकावली

पिंपरी l प्रतिनिधी

सहकारी शिक्षेसोबत रिक्षातून प्रवास करत असलेल्या शिक्षिकेची दोन चोरट्यांनी पर्स हिसकावून नेली. त्यात 33 हजारांचा ऐवज असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना बुधवारी (दि. 13) रात्री अकरा वाजता पिंपळे निलख येथे घडली.

याप्रकरणी शिक्षिका महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या सहकारी शिक्षिका ओला रिक्षातून जात होत्या. त्या न्यू डीपी रोड पिंपळे निलख येथे आल्या असता रिक्षाच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या खांद्याला अडकवलेली पर्स जबरदस्तीने ओढून चोरून नेली. परमध्ये मोबाईल फोन, रोख रक्कम, 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, बँकेचे एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असा 33 हजारांचा मुद्देमाल होता. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button