पिंपरी l प्रतिनिधी
रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाच्या हातातील मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना 10 एप्रिल रोजी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास चिखली ते तळवडे चौकाकडे जाणा-या रस्त्यावर घडली.
आरिफ आयुब शेख (वय 23, रा. तळवडे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चिखली ते तळवडे चौकाकडे जाणा-या रस्त्याने पायी चालत जात होते. ते जायका चहाच्या हॉटेलसमोरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हातातील सात हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.