ताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत सहावे सेरो सर्वेक्षण ; नऊ महिन्यांच्या पाहणीतून वर्धक मात्रेच्या उपयुक्ततेचा अभ्यास

मुंबई | करोनाच्या वर्धक मात्रेनंतर आरोग्य आणि अत्यावश्यक कर्मचाऱ्यांमध्ये किती प्रमाणात प्रतिपिंडे तयार झाली आणि ही प्रतिपिंडे किती काळ टिकणार याचा आढावा घेण्यासाठी पालिका सहावे सेरो सर्वेक्षण करणार आहे. हे सर्वेक्षण जवळपास नऊ महिने चालणार असून प्रथमच एवढय़ा मोठय़ा कालावधीचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या २०२१ च्या सुरुवातीलाच लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या होत्या. करोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दिले जात होते. त्यावेळी या कर्मचाऱ्यांच्या दोन्ही मात्रा पूर्ण होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेल्यामुळे प्रतिपिडांची संख्या कमी झाल्याने वर्धक मात्रा देण्याची मागणी मोठय़ा प्रमाणात केली जात होती. परंतु वर्धक मात्रेबाबत कोणताही अभ्यास नसल्यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाने याबाबत ठोस निर्णय देण्यास नकार दिला. अखेर तिसरी लाट सुरू झाल्यानंतर १ जानेवारीपासून वर्धक मात्रा देण्यास सुरुवात करण्यात आली. करोनाचा प्रादुर्भाव सध्या कमी झाला असला तरी पुढील लाट येण्याचे संकेत दिले जात आहेत. तेव्हा पुढील लाट येण्याच्या काळात आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्धक मात्रेमुळे पुरेसे सक्षम आहेत का किंवा त्यांना पुन्हा वर्धक मात्रा देण्याची गरज भासू शकते याचा अभ्यास पालिका करणार आहे. यासाठी सहावे सेरो सर्वेक्षण पालिका करणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. वर्धक मात्रेच्या या अभ्यासातून हाती आलेले निष्कर्ष महत्त्वाचे असून केंद्रीय आरोग्य विभागाकडेही हा अभ्यास सादर केला जाईल. पुढील वर्धक मात्रेच्या निर्णयासाठी हा अभ्यास फायदेशीर असेल, असेही काकाणी यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button