Uncategorizedताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

‘मेरा रंगती बसंती’, ‘दिल ढूंढता है फिर वही’ गाणारे पार्श्वगायक भूपिंदर सिंह काळाच्या पडद्याआड

मुंबई : ‘दिल ढूंढता है फिर वही’, होके मजबूर मुझे उसे बुलाया होगा, मेरा रंग दे बसंती चोला, अशा एक ना अनेक गाण्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालणारे बॉलिवूडचे पार्श्वगायक भूपिंदर सिंह यांनी आज अखेरचा निरोप घेतलाय. सोमवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या पत्नीने माध्यमांना दिली. ८२ वर्षीय भूपेंद्र सिंह गेल्या अनेक दिवसांपासून आजाराशी झगडत होते.

गायक भूपिंदर सिंग यांनी मुंबईतील राहत्या अखेरचा श्वास घेतला. भूपिंदर यांच्या जाण्याने संगीतक्षेत्रात शोककळा पसरली आहे. भूपिंदर सिंह मागील काही दिवसांपासून आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या तब्येतीच्या अनेक तक्रारी होत्या, असं त्यांच्या पत्नी मिताली यांनी सांगितलं. भूपिंदर सिंग यांनी मौसम, सत्ता पे सत्ता, आहिस्ता आहिस्ता, दूरियां आणि हकीकत अशा अनेक चित्रपटांच्या गाण्यांना आपला आवाज दिला. ‘मेरा रंग दे बसंती चोला’, ‘प्यार हमें मोड़ पर ले गया’, ‘हुजूर इस कादर’, ‘एक अकेला इस शहर में’, ‘जिंदगी मिलके बिताएंगे’, ‘बीती ना बिताये रैना’ अशी अजरामर गीतं त्यांनी गायली.

भूपिंदर सिंह यांना ‘मौसम’,’सत्ते पे सत्ता’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘दूरियां’, ‘हकीकत’ अशा चित्रपटांमधील गीतांनी त्यांनी आपल्या संस्मरणीय आवाजाचा साज चढवला. ‘होके मजबूर मुझे, उससे बुला होगा’, (मोहम्मद रफी, तलत मेहमूद आणि मन्ना डे यांच्यासोबत), ‘दिल धुंदता है’, ‘दुकी पे दुकी हो या सत्ता पे सत्ता’ अशी अनेक गीते लोकांच्या ओठावर आजही आहेत.

कोण आहेत भूपिंदर सिंग?

भूपिंदर सिंह यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1940 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला होता. त्यांचे वडील प्रोफेसर नाथा सिंग हे देखील उत्तम संगीतकार होते. त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात भूपिंदर यांनी ऑल इंडिया रेडिओवर काम केलं. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या गुलजार यांनी लिहिलेल्या ‘वो जो शहर था’ या गाण्याने त्यांना प्रसिद्धी मिळाली. भूपेंद्र यांनी १९८० मध्ये बंगाली गायिका मिताली मुखर्जीसोबत लग्न केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शोक व्यक्त

प्रख्यात गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी गायलेली काही गाणी आणि गझला अविस्मरणीय असून नवोदित गायकांना भूपिंदर सिंह यांचा प्रवास मार्गदर्शक ठरेल असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button