breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सिद्धार्थ पिठाणीला अटक

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने सर्वात मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने सुशांतचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली आहे. त्याला हैदराबादमधून ताब्यात घेण्यात आले असून लवकरच मुंबईत आणणार असल्याची माहिती मिळत आहे. धक्कादायक म्हणजे सुशांतसिंह राजपूतला ड्रग्ज दिल्याच्या कटात हात असल्याचा आरोप सिद्धार्थ पिठाणीवर आहे.

Narcotics Bureau Control arrests Siddharth Pathani from Hyderabad in the drugs case linked to Bollywood actor Sushant Singh Rajput’s death: NCB

— ANI (@ANI) May 28, 2021

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून 2020 रोजी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. मात्र तो आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने केला होता. सुशांतच्या चाहत्यांनीही त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत, त्याला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या. यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरण हत्येच्या संशयामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. मात्र सुशांतने आत्महत्या केल्याचे तपासात उघड झाले होते. परंतु त्याच्या आत्महत्येमागे काय कारण होते हे अद्याप समजलेले नाही.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button