breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘भाजपकडून शिवसेनेसोबत दुजाभाव, एक कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा’; श्रीरंग बारणे

पिंपरी | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा काल (९ जून) पार पडला असून ७१ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाने महाराष्ट्रातील त्यांच्या मित्रपक्षांवर अन्याय केल्याची टीका होत आहे. ४८ खासदार असलेल्या बलाढ्य अशा महाराष्ट्राला केवळ दोनच कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेच्या शिंदे गटात नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे (मावळ लोकसभा) यांनी भाजपाविरोधातील नाराजी व्यक्त केली आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना एनडीएने न्यायिक भूमिका घ्यायला हवी होती. त्यांनी अजित पवारांच्या पक्षालाही मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यायला हवं होतं. ही आमच्यासह महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा होती. अजित पवार यांनी मधल्या काळात आपल्या कुटुंबाशी वाईटपणा घेतला. ही गोष्ट आपण नाकारून चालणार नाही. तसेच ते भाजपा आणि एनडीएचे घटक पक्ष म्हणून काम करत आहेत. त्यामुळे अजित पवारांना न्याय मिळावा ही सर्वांची अपेक्षा आहे. दुसऱ्या बाजूला, भाजपाने कोणाला मंत्री करावं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला न्याय मिळावा ही राज्यातील जनतेची भूमिका आहे. उदयनराजे भोसले हे तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत आणि ते वरिष्ठ देखील आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला मान मिळाला असता तर राज्यातील जनतेला अभिमान वाटला असता.

हेही वाचा      –        काल केंद्रीय मंत्रीपदाची शपथ, आज राजीनामा? भाजपाच्या खासदाराचे वक्तव्य चर्चेत

शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आहेत. तर भाजपाने राज्यात २८ जागा लढवून त्यापैकी त्यांना केवळ ९ जागा जिंकता आल्या. आम्ही १५ पैकी ७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आमची अपेक्षा होती की शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद मिळेल. तसेच शिवसेना हा भाजपाचा अतिशय जुना साथीदार आहे त्यामुळे भाजपाने शिवसेनेला केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद द्यायला हवं होतं, अशी आमची पेक्षा होती. भाजपाने पाच खासदार असलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद दिलं आणि आम्हाला एक राज्यमंत्रिपद दिलं. त्यामुळे कुठेतरी आमच्याबरोबर दुजाभाव होतोय असं दिसतंय, असंही श्रीरंग बारणे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button