TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीतील सत्ताधारी भाजपचा भ्रष्टाचार काढून दाखवा, सचिन अहिर यांचे किरीट सोमय्यांना आव्हान

पिंपरी चिंचवड | पिंपरी – चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर आरोप करण्यापेक्षा महापालिकेतील या भ्रष्टचाराकडे लक्ष द्यावे. त्यांनी येथील भ्रष्टचार बाहेर काढून दोषींवर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी, असे खुले आव्हान शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी आज (मंगळवार, दि.16 नोव्हें) सोमय्यांना दिले.साने चौक, चिखली येथे शिवसेनेच्या नेताजी काशिद आणि साधना काशिद यांच्या वतीने तब्बल २५ फुटी पुष्पहाराने श्री. अहिर यांचे अनोखे स्वागत करण्यात आले त्यावेळी झालेल्या छोटेखानी सभेत ते बोलत होते. या प्रसंगी शिवसेना मोरेवस्ती शाखेच्या वतीने पिंपरी – चिंचवड महापालिकेतही भ्रष्टचाराच्या विरोधात जमा केलेल्या दोन हजार सह्यांचे निवेदन श्री. अहिर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील, शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, गटनेते राहुल कलाटे, माजी शहरप्रमुख योगेश बाबर, उपशहरप्रमुख नेताजी काशिद, साधना काशिद, रावसाहेब थोरात, सचिन सानप, युवराज कोकाटे, संजय गाढवे, सुमंत तांबे, हरिभाऊ लोकरे, अनंत मते, सूर्यकांत देशमुख, अशोक गायकवाड, विजय शिवपुजे, गणेश अवचिते, रमेश सांगडे, मोहन डोळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

संकटात केंद्राकडून मदत नाही

गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारी, लॉकडाऊन, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, पूर अशी अनेक संकटे महाराष्ट्रावर आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने या संकटांचा संयमाने सामना केला. मात्र, केंद्र सरकारने या संकट काळात राज्याला कोणतीही मदत दिली नसल्याची टीका अहिर यांनी यावेळी केली.

अनोख्या स्वागताने भारावले अहिर

नेताजी काशिद आणि साधना काशिद यांच्यावतीने तब्बल २५ फुटी भव्य पुष्पहाराने संपर्कप्रमुख अहिर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे वातावरण जल्लोषपूर्ण बनले होते, या जल्लोषपुर्ण वातावरणात स्वतः सचिन अहिर भारावून गेल्याचे पहायला मिळाले. या स्वागताने मोरेवस्तीत शिवसेनेची मजबूत बांधणी असल्याचे अहिर यांनी नमूद केले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button