breaking-newsमुंबईराजकारण

महिलांना मंत्रिमंडळात घ्यावं का? अमृता फडणवीस काय म्हणाल्या वाचा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना महिलांना आदर देण्याची भाषा केली होती. त्यावरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मोदींना प्रत्युत्तर दिले. मोदींनी प्रथम केंद्रात महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करावं, असे पेडणेकर यांनी म्हटले. याविषयी अमृता फडणवीस यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, आपल्याकडे अगोदरच खूप प्रकारची आरक्षणं आहेत.

 

Amruta Fadnavis Cabinet
  • अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला
  • महाराष्ट्र हा सध्या पायाभूत क्षेत्रात मागे पडला आहे
  • आता नव्या सरकारला ही उणीव भरून काढण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागणार आहे
मुंबई । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।
शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला स्थान मिळाल्याची टीका सुरु असतानाच आता अमृता फडणवीस यांनी एक वेगळीच भूमिका मांडली आहे. महिलांना मंत्रिमंडळात जरुर स्थान मिळायला हवे. पण महिलांनी आरक्षणासारख्या सुविधेचा लाभ घेण्यापेक्षा स्वत:च्या मेहनतीवर मंत्रिपद मिळवले पाहिजे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले. त्या सोमवारी मुंबईत प्रसारमध्यामांशी बोलत होत्या. यावेळी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. 

यावेळी अमृता फडणवीस यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश नसल्याबद्दल विचारणा झाली. तेव्हा अमृता फडणवीस यांनी म्हटले की, महिलांना नक्कीच मंत्रिमंडळात स्थान मिळाले पाहिजे. पण महिलांनी मंत्रिपदाची डिमांड करण्यापेक्षा पुरुषांएवढीच मेहनत करून त्या पदावर कमांड मिळवली पाहिजे. त्यावेळी महिलांना जास्त मान मिळेल, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना महिलांना आदर देण्याची भाषा केली होती. त्यावरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मोदींना प्रत्युत्तर दिले. मोदींनी प्रथम केंद्रात महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करावं, असे पेडणेकर यांनी म्हटले. याविषयी अमृता फडणवीस यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, आपल्याकडे अगोदरच खूप प्रकारची आरक्षणं आहेत. त्यामुळे माझं मत असं आहे की, माझी प्रतिनिधी असलेल्या महिलेने मेहनतीन पुढे यावे आणि ती जागा पटकावावी. त्यामध्ये तिला जो आदर मिळेल, तो कशातच मिळणार नाही, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. महाराष्ट्र हा सध्या पायाभूत क्षेत्रात मागे पडला आहे. त्यामुळे आता नव्या सरकारला ही उणीव भरून काढण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागणार आहे. नव्या सरकारला माझ्या शुभेच्छा. त्यांच्या काळात महाराष्ट्राने वेगाने घोडदौड करावी, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.

मी ‘सामना’ वाचत नाही: अमृता फडणवीस
यावेळी अमृता फडणवीस यांना ‘सामना’तून शिंदे-फडणवीस सरकारवर करण्यात आलेल्या टीकेविषयी विचारण्यात आले. त्यावर अमृता फडणवीस यांनी म्हटले की, ‘सामना’बाबत मला काही माहिती नाही. त्यांचे विचार वेगळे आहेत. माझ्यासाठी जनतेचे प्रतिनिधी असणाऱ्या प्रसारमाध्यमांचे विचार महत्त्वाचे आहेत, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले. यावेळी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीवर केलेल्या टीकेवरही भाष्य केले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून भाजपने ज्वलंत उदाहरण समोर ठेवले आहे. महाराष्ट्रात घराणेशाही संपवण्याच्या दिशेने भाजपने एक पाऊल पुढे टाकल्याचे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button