पिंपरी / चिंचवड

दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मारहाण करत दुकानाची तोडफोड

पिंपरी l प्रतिनिधी

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने चार जणांनी मिळून स्वीट मार्टच्या दुकानात तोडफोड केली. तसेच दुकानदार व त्याच्या भावाला मारहाण करून चार हजार रुपये काढून घेतले आणि एका रिक्षाची तोडफोड केली. ही घटना सोमवारी (दि. 3) रात्री साडेदहा वाजता शास्त्री चौक, भोसरी येथे गोकुळ स्वीटस या दुकानात घडली.

सूरज चुन्नीलाल चौधरी (वय 18, रा. संभाजीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोशन, शंकर आणि दोन अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भोसरीतील शास्त्री चौकात स्वीट मार्ट आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजता फिर्यादी दुकान बंद करत होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. आरोपींनी दारूसाठी पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. एकाने फिर्यादी यांना चावा घेतला, एकाने दुकानात दगड मारून नुकसान केले. फिर्यादीच्या खिशातील चार हजार रुपये काढून घेतले. फिर्यादी यांचा भाऊ भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही आरोपींनी मारहाण केली. एका रिक्षाची तोडफोड केली. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button