breaking-newsताज्या घडामोडीपुणे

धक्कादायक! पीएमपीएमएलच्या कंडक्टरने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी केली अटक

पुणे |

पीएमपीएमएलच्या स्वारगेट ते विश्रांतवाडी या मार्गावर प्रवास करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वाहकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत किसन गोडगे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पीडित मुलगी ही स्वारगेट ते विश्रांतवाडी या मार्गावर बसने प्रवास करत होती. यावेळी आरोपी वाहक तिच्या बाजुला थांबून मोठ्या आवाजात तिच्यावर ओरडला. पण ती तरुणी काहीच न बोलता बाजूलाच उभा राहिली. दरम्यान, काही वेळानंतर बसमध्ये आलेल्या तिकीट चेकरकडे या तरुणीने वाहकाच्या असभ्य आणि गैरवर्तनाविषयी तक्रार केली.

दरम्यान, तिकीट चेकर निघून गेल्यानंतर मुलीबद्दलचा राग मनात धरून आरोपीने तिच्या कमरेला हात लावला. आरोपीने हा प्रकार तीन वेळेस केला. त्यानंतर घाबरलेल्या मुलीने बंडगार्डन पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला तातडीने अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

  • काय म्हणाले पोलीस?

पीडित मुलगी ही शालेय विद्यार्थिनी आहे. शाळेत जाण्यासाठी ती रोज बसने प्रवास करत असते. शाळा शुटल्यानंतर ती काल बसमधून घरी जात होती. यावेळी बस वाहकाने तिला पुढे चल, पुढे चल म्हणत तिच्या शरीराला अनावश्यक स्पर्श केला. आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श होत असल्याचं लक्षात आल्यावर तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला हात लावायचा नाही, अशा कडक भाषेत तिने वाहकाला सुनावलं. पण त्यानंतरही आरोपी वाहक प्रशांत गोडगे हा तिला स्पर्श करत राहिला.

बस प्रवासादरम्यान तिकीट तपासणीसाठी गाडी थांबवण्यात आली. तिकीट चेकरलाही तिने हा प्रकार सांगितला. यानंतर तिकीट चेकरनेही वाहक गोडगेला समजावलं. ते उतरून गेल्यानंतर त्याने पुन्हा तोच प्रकार सुरूच ठेवला आणि तिला चुकीच्या पद्धती स्पर्श करत राहिला. हे वारंवार सांगूनही तो ऐकत नाही, हे पाहिल्यावर तिने आरडाओरड केली. मग ती पोलीस ठाण्यात आली. आरोपीविरोधात ३५४ चा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बस कंडक्टरला अटक केली आहे. आणि त्याला कोर्टात हजर केले जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button