breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धक्कादायक! ​वारीतील संकटातून पांडुरंगाने तारलं, भरधाव कंटेनर घुसला दिंडीत, १५ महिला बचावल्या​

बीड : सध्या अवघ्या महाराष्ट्रत पंढरपूरच्या वारीचं वातावरण आहे. या वारीला संपूर्ण महाराष्ट्रातले लोकं एकत्र येतात. मात्र, या वारीदरम्यान, अपघात होणं ही खरचं मोठी बाब आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीची प्रचिती आज बीडमध्ये आली. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या पाली गावात एका कंटेनरने दिंडीमधील पाण्याच्या टँकरला जोरात धडक दिली. शेकडो वारकरी भक्त रस्त्याच्या कडेला जेवणासाठी थांबले होते. अपघात झाल्याने अचानक एकच गोंधळ उडाला.

मात्र, सुदैवाने आणि विठ्ठलाच्या आशिर्वादाने या अपघातात जीवितहानी टळली. या अपघातात टँकर चालक जखमी झाला. १० ते १५ महिला भाविक टँकरशेजारी बसल्या होत्या. मात्र, ‘पांडुरंगाची कृपा म्हणून आम्ही सुखरुप वाचलो’ अशी भावना वारकरी भाविकांनी व्यक्त केली. त्यानंतर काही काळ सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कंटेनरचा ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत होता. त्यामुळे हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. यामुळे कंटेनर चालकाला वारकऱ्यांनी चांगला चोप दिला.

अपघात ज्यांनी पाहिला ते प्रत्यक्षदर्शी सांगतात की, ड्रायव्हर दारू पिलेला होता आणि आम्ही जेवायला बसलो होतो. काही महिला टँकरच्या बाजूला पाणी पिऊन रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या. काही महिला बसल्या होत्या, मात्र, या कंटेनर ड्रायव्हरने डायरेक्ट येऊन वारकऱ्यांच्या पाण्याच्या टँकरला धडक दिली आणि टॅंकर जागेवर पलटी झाला. मात्र, ज्या ठिकाणी टँकर पलटी झाला त्याच बाजूला महिला बसलेल्या असल्याने सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. पण ते म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मारी’ याची प्रचिती यावेळी आली. ‘पांडुरंगा साठीच आम्ही वारी ला जातोय त्याच्या नाम जयघोषात आम्ही प्रवास करतोय त्याच पांडुरंगाने आम्हाला आज वाचवलं’, अशा भावना तेथील प्रत्यक्षदर्शी वारकरी व्यक्त करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button