ताज्या घडामोडीपुणे

‘द कश्मीर फाइल्स’ पाहिल्यानंतर पुण्यात धक्कादायक घटना

मेंदूला रक्तपुरवठा करणारी नस फुटून तरुणाचा मृत्यू

पुणे |  दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा सध्या खूपच चर्चेत आहे. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर २०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या सिनेमात १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर त्यांनी केलेलं पलायन दाखवलं आहे. अर्थात या सिनेमाला एका विशिष्ट वर्गानं विरोध केला आहे. अनेकांनी हा सिनेमा समाजात फूट पाडणारा असल्याचं मत नोंदवलं आहे. तसंच यामुळे समाजामध्ये मुस्लिम द्वेष पसरला जात असल्याचंही मत व्यक्त केलं आहे. या चित्रपटामुळे पुण्यात एका तरुणावर भयंकर परिणाम झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री द कश्मीर फाइल्स बघितला आणि सकाळी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमधील एक तरूण कश्मीर फाइल्स चित्रपट बघायला गेला आणि घरी परत आल्यानंतर जो प्रकार घडला त्याची कल्पना कदाचित त्या तरुणाने देखील केली नसावी.

अभिजीत शशिकांत शिंदे वय ३८ असं या तरुणाचं नाव आहे. तो पिंपरीतील लिंक रोड येथील रहिवासी होता. द कश्मीर फाईल्स चित्रपट बघून त्याला ब्रेन स्ट्रोक होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खरंतर, अभिजीतवर हिंदुत्ववादी संघटनेचा प्रभाव आहे. त्यामुळे अतिविचाराने हे झालं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अभिजित आणि त्याचे काही मित्र २१ मार्च रोजी रात्री द कश्मीर फाइल्स हा चित्रपट बघितला होता. चित्रपट बघून झाल्यावर घरी आल्यानंतर अभिजित आणि त्याच्या मित्रांनी जवळपास तासभर चित्रपटावर चर्चा केली.

मित्रांसोबत चर्चा उरकून अभिजीत नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी घरी गेला. मात्र, दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी अभिजीतच्या मेंदूची रक्तवाहिनी फुटली आणि मेंदूला रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे त्याला ब्रेन स्ट्रोक झाला. मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी फुटल्याने तो बेशुद्ध झाला. अभिजीत जेव्हा सकाळी लवकर उठला नाही तेव्हा त्याच्या वडिल त्याच्या रूममध्ये गेले असता अभिजीत बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले परंतु त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं.

अभिजीतचा ब्रेन स्ट्रोकने मृत्यू झाला आहे. मात्र, त्याच्या ब्रेन स्ट्रोकच कारण काय आहे ? हे स्पष्ट होऊ शकले नाहीये. परंतु रात्री द कश्मीर फाईल्स चित्रपट बघितला आणि त्यामुळे त्याला ब्रेन स्ट्रोक झाला असल्याचा त्याच्या मित्रांचा आणि कुटुंबीयांचा दावा आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button