breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

धक्कादायक! विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाच्या ICU विभागात आग, १३ रुग्णांचा मृत्यू

विरार – नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी (21 एप्रिल) दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेने अख्खा महाराष्ट्र सुन्न झालेला असतानाच आज विरार येथील एका रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत १३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. यात १३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. चार मजली असलेल्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी रुग्णालयात ९० जण उपचार घेत होते, तर अतिदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार होते. त्यापैकी १३ कोरोनाबाधितांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान, अग्निशमन दल आणि पोलिसांनी या आगीवर नियंत्रण मिळवले असून इतर रुग्णांची सुटका करण्यात आली आहे, तर ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

वल्लभ कोव्हिड रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते, असेही बोलले जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या ही आग पूर्णपणे विझवण्यात आली असून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. तसेच या रुग्णालयातील सर्व रुग्णांना वसई-विरार-नालासोपारा परिसरातील विविध रुग्णालयांत हलवण्यात येत आहे.

मृतांची नावे
1. उमा सुरेश कनगुटकर
2. निलेश भोईर
3. पुखराज वल्लभदास वैष्णव
4. रजनी आर कडू
5. नरेंद्र शंकर शिंदे
6. जनार्दन मोरेश्वर म्हात्रे
7. कुमार किशोर दोशी
8. रमेश टी उपयान
9. प्रविण शिवलाल गोडा
10. अमेय राजेश राऊत
11. रामा अण्णा म्हात्रे
12. सुवर्णा एस पितळे
13. सुप्रिया देशमुखे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button