breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! २१ वर्षीय तरुणीला फरफटत नेत दगडाने वार अन् बलात्काराचा प्रयत्न; अल्पवयीन मुलाच्या कृत्याने पोलीसही चक्रावले

केरळ |

केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यात १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने २१ वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी तरुणी कॉम्प्यूटर क्लाससाठी निघाली असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. मार्शल आर्ट ज्युडोचं प्रशिक्षण घेतलेल्या आरोपी तरुणाने तरुणीला रस्त्यावरुन ओढत जवळच्या झाडांमध्ये नेलं होतं. यानंतर त्याने तिचे हात दुपट्ट्याने बांधण्याचा प्रयत्न करताना दगडाने डोक्यावर वार करत गळा दाबण्याचा प्रयत्न केला.

या ठिकाणी लोकांची जास्त वर्दळ नसते त्यामुळे घटना घडली तेव्हा तिथे कोणीच नव्हतं असं पोलिसांनी सांगितलं आहे. तरुणीने आरोपीपासून सुटका करुन घेत पळ काढला आणि जवळचं घर गाठलं. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आला. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं.

“आम्ही पीडित तरुणीशी सविस्तर चर्चा केली. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचं चित्र रेखाटण्यात आलं. त्यानंतर तपास करताना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीची चौकशी केली,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी आणि तरुणी एकमेकांना ओळखत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तपास सध्या सुरु आहे. मात्र पीडित तरुणीवर सध्या उपचार सुरु असून या धक्क्यातून सावरण्यासाठी तिला काही वेळ लागणार आहे. त्यानंतर तपास पूर्ण होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button