breaking-newsताज्या घडामोडीपुणे

धक्कादायक! भर दिवसा १२ वर्षीय मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार

पुणे |

पुण्यात पोलिसांचा धाक राहिला की नाही असा प्रश्न आता पुणेकर विचारात आहेत. कारण, कुठे कोयत्या गँगची दहशत तर कुठे भर दिवसा दुकानदारांची लूट, कुठे शाळेच्या आवारात विनयभंग तर कुठे चालू रिक्षात छेडछाड सतत सुरू आहे. आता तर पुण्यात गुन्हेगारीचा कळस झाला आहे. कारण स्टेशनच्या जवळच १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक सौचालायात भर दिवसा बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर भरदिवसा सार्वजनिक शौचालयात बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बंडगार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे. पुणे स्टेशनजवळील जनसेवा शौचालयात हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही कुटुंबीयांसह पुणे स्टेशन परिसरातच राहण्यास असून साफसफाईची कामे करते. शुक्रवारी दुपारी ते सार्वजनिक शौचालयात गेले असता आरोपी ही तिच्यापाठोपाठ शौचालयात गेला. त्यानंतर तिला खाली पाडून जबरदस्तीने त्याची शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर पळून गेला. दरम्यान, पीडित मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला आणि त्यानंतर या प्रकरणाला वाचा फोडली. पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी मारवाडी नामक एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी हा पीडितेच्या कुटुंबीयांचा चांगला ओळखीचा आहे. तो दररोज पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला भेटत होता. तर हा प्रकार झाल्यापासून तो बेपत्ता आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button