breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

धक्कादायक! कन्हैयाच्या शरीरावर २६ चाकूचे वार, १३ जागी अवयव कापले; शवविच्छेदन रिपोर्टमध्ये खुलासा

उदयपुर : उदयपूरमध्ये झालेल्या टेलर कन्हैया लालच्या हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवले आहे. या भयंकर हत्याकांडामध्ये आता धक्कादायक खुलासे समोर आले आहे. आता पोलिसांकडून देण्यात आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही अनेक मोठे खुलासे झाले आहेत. हा रिपोर्ट वाचल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.

रिपोर्टनुसार, गुन्हेगारांनी कन्हैयाच्या शरीरावर चाकूने अनेक वार केले. यादरम्यान त्यांनी त्याच्यावर २६ वार केले, ज्यामध्ये त्याचे शरीर १३ वेळा गंभीरपणे कापले गेले. या धक्कादायक खुलाशानंतर निषेधाचा सूर आणखी तीव्र झाला आहे. प्रत्यक्षात हत्येचे दोन्ही आरोपी झब्बा शिवायचा आहे असं सांगून कन्हैयाच्या दुकानात आले होते. कन्हैयाने माप घेण्यास सुरुवात करताच त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कन्हैया लालची त्याच्या दुकानात निर्घृण हत्या केल्यानंतर बुधवारी त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आणि आज त्यांच्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात कन्हैयालाल यांची अंत्ययात्रा निवासस्थानापासून स्मशानभूमीकडे रवाना झाली. ज्यामध्ये मोठ्या संख्येने स्थानिक लोक उपस्थित होते. विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारियादेखील बुधवारी मृतक कन्हैयालाल यांच्या घरी गेले होते.

हत्यारांचा पाकिस्तानशी संबध असल्याचा संशय

या भयंकर हत्याकांडामध्ये अटक करण्यात आलेल्या दोनही आरोपींचा पाकिस्तानशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. एजन्सींना असा संशय आहे की रियाझ स्वतः ISIS चा कार्यकर्ता असू शकतो. कारण, त्याच्या फेसबुक फोटोंमध्ये तो जगभरातील इस्लामिक स्टेटच्या कार्यकर्त्यांद्वारे वापरल्या जाणार्‍या बोटांच्या संकेतांचा वापर करताना दिसतो. त्यामुळे त्याने दहशतवादी ट्रेनिंग घेतलं असल्याचाही संशय आहे.

कसा रचला हत्येचा कट?

मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास दोघेजण कपडे शिवण्याच्या बहाण्याने त्यांच्या दुकानात आले. काही कळण्याच्या आत त्यांनी तेली यांच्यावर शस्त्रांनी हल्ला केला. त्यांच्यावर अनेक वार करण्यात आले आणि त्यांचा गळा चिरण्यात आला. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.

आरोपी रियाज आणि मोहम्मद याने त्याप्रकारे ही निर्घृण हत्या केली, त्यानुसार परिसरात पोलिसांचा धाक उरला नाही हेच समोर येतं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. तर यामुळे शहरातही तणावाचं वातावरण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button